
सावदा येथे ईद,ए ,मिलादुन्नबी शांततेसह उत्साहात साजरी
मुख्तार शेख सावदा I या गरिब नवाज जन सेवा ग्रुप सावदा यांनी जशने ईद-ए-मिलादुन्नबी या माध्यमातून या ग्रुप तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला जुलूस मध्ये ठिकठिकाणी नाष्टा तसेच बिस्किट चॉकलेट पोहा सरबत फराळ वाटप करण्यात आले म्हणून या सर्व लोकांनी फेकलेला घाणकचरा स्वतः उचलून मोहम्मद सल्लल्लाहू अलैही वसल्लम यांची प्रेरणा घेऊन त्यांनी हे कार्य केले म्हणून यामुळे सावदा येथील सर्व जाती धर्मांच्या लोकांनी त्यांच्या मन पासून कौतुक केले .
तसेच संभाजी गणेश मित्र मंडळ सावदा यांनी या गरीब नवाज जनसेवा ग्रुप यांच्या सत्कार केला. यामध्ये वसीम उर्फ बंडू सय्यद अजहर, शेख अल्ताफ, इरफान पिंजारी, सलमान शेख, जावेद जनाब , फारुख भाई ,इरफान मोमीन, शेख जुबेर ,मोहसीन खान, अकरम खान, राजू भाई, रऊफ पिंजारी ,साबीर पिंजारी, यांनी कार्य केले
तसेच सावदा येथील मुस्लिम पंच कमेटी कदिर हाजी साहब जेष्ठ पत्रकार युसुफ शाह पत्रकार फरिद शेख फिरोज खान लेफ्टी असलम मौलाना, शेरखान मुख्तार शेख अजहर शेख,मोईन खान अमजद खान इरफान मियां यांनी परिश्रम घेतले. सावदा पोलिस ठाण्याचे ए पी आय विशाल पाटील सर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तसेच शेख पुरा युवा मंच तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही संध्याकाळी ईद एक मिलादुन्नबी यांच्या नावाने भंडारा,(लंगर,,) जेवणाची व्यवस्था केली आहे असं आवाहन शेख पुरा युवा मंच चा वतीने केले आहे.





