
जळगावमध्ये सोन्याचे भाव पुन्हा वधारले; चांदी स्थिर
जळगाव प्रतिनिधि जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोने-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. जळगाव आणि सावदा येथील नामांकित भंगाळे गोल्ड दालनातील दरानुसार, आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹९७,९२०, तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ₹१,०६,९०० इतका आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२४,५०० नोंदवला गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर स्थिर असले तरी सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने विक्रीत चैतन्य असून, आज पुन्हा भाव वाढल्याने सुवर्णप्रेमींच्या खिशाला चिमटा बसणार आहे.
भंगाळे गोल्ड या दालनात आकर्षक डिझाईनचे दागिने, पारदर्शक व्यवहार आणि शुद्धतेची हमी दिली जात असल्याने ग्राहकांचा विश्वास या सराफ पेढीवर अधिक दृढ झाला आहे. सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारामुळे खरेदीदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.





