इतर

पातोंडा खून प्रकरणातील पाच आरोपींना मध्यप्रदेशातून अटक

पातोंडा खून प्रकरणातील पाच आरोपींना मध्यप्रदेशातून अटक

अमळनेर पोलिसांची  कारवाई; आरोपी दुर्गम डोंगराळ भागातून पकडले

अमळनेर (प्रतिनिधी):
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील ठेकेदाराच्या भावाचा अमानुषपणे मारहाण करून खून करणाऱ्या पाच आरोपींना अमळनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील दुर्गम डोंगराळ भागातून अटक केली आहे. ही कारवाई मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने करण्यात आली.

खून प्रकरणी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचे कलम वाढवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हे.कॉ. विजय भोई, पोलीस राहुल गोकुळ पाटील आणि राहुल नारायण पाटील यांचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेशात पाठवण्यात आले होते. आरोपी डोंगर व जंगल भागात लपले होते.

मोबाईल विश्लेषणात गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांच्या तांत्रिक सहाय्याने  गोपाल साहुलाल धुर्वे (वय ३५),पंकज उमरावसिंग शिलु (वय २७),सलीम निर्मलशहा धुर्वे (वय २२),रोहित बुद्धसिंग शिलु (वय १९),शिवम फुलसिंग शिलु (वय १८)
(सर्व रा. बीजाधाना, पो. ईटावा, ता. तामिया, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आले.

या आरोपींनी सुमारे १०० ते १५० किमीच्या परिसरातील डोंगर व दऱ्यांतून पलायन केले होते. मात्र पोलिसांनी चिकाटीने शोध घेत अटक केली.

दि. २९ मे रोजी, पातोंडा येथे कैलास शामसिंग प्रजापती या ठेकेदाराच्या भावाला मध्यप्रदेशातून आलेल्या मजुरांनी कामाचे पैसे न दिल्याने आणि दुसरे कामगार आणल्याच्या रागातून लोखंडी पाईप व पहाराने अमानुष मारहाण केली. त्याच्या हात, पाय आणि तोंडावर गंभीर घाव झाले. कैलास यांना रात्रभर विका सोसायटी कार्यालयात बेशुद्ध अवस्थेत ठेवले गेले.

सकाळी त्यांना प्रथम अमळनेर, नंतर धुळे व शेवटी इंदोर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कैलास यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button