इतर

महावितरणचा कंत्राटी वायरमन लाच घेताना जाळ्यात 

महावितरणचा कंत्राटी वायरमन लाच घेताना जाळ्यात 

जळगाव एसीबीची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचा बनाव करून तक्रारदाराकडून लाच मागणाऱ्या महावितरणच्या कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी, १० जून रोजी दुपारी ३ वाजता ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

प्रभात कॉलनी कक्षात कार्यरत भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७, रा. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराच्या घराचे वीज मीटर बदलण्याच्या प्रक्रियेत चौधरीने सील तुटल्याचा बनाव करत वीजचोरीचा गुन्हा दाखल होईल, असा धमकीवजा इशारा दिला. त्यानंतर मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पडताळणीदरम्यान चौधरीने पंचासमक्ष ५ हजार रुपये मागून ती स्वीकारली. यावरून एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला लाच स्वीकारताना पकडले. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button