
साधेपणा, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश; जळगावात शिकलगर मुस्लिम समाजाचा चौथा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात
जळगाव | प्रतिनिधीआजच्या वाढत्या खर्चिक विवाह पद्धतीच्या काळात समाजाला साधेपणा, एकता आणि इस्लामी मूल्यांचा सकारात्मक संदेश देणारा शिसगर मुस्लिम समाज फाउंडेशन, सुप्रीम कॉलनी जळगाव आयोजित चौथा सामूहिक विवाह सोहळा रविवारी, २४ मे रोजी मन्यार हॉल येथे धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सामूहिक विवाह सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विविध बिरादरीतील वधू-वरांचा सहभाग. चार विवाहांमध्ये दोन मनियार बिरादरी, एक शिकलगार बिरादरी आणि एक पटेल बिरादरीतील जोडप्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, एका विवाहात वधू-वर हे वेगवेगळ्या बिरादरीतील असूनही इस्लामी शरियतच्या मार्गदर्शनानुसार विवाह पार पडला. त्यामुळे बिरादरीपेक्षा इस्लामी बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि मानवी एकतेलाच अधिक महत्त्व दिले पाहिजे, असा सकारात्मक संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
“सामूहिक विवाह ही काळाची गरज”
सामूहिक विवाह सोहळ्यात बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना समाजातील वाढत्या अनावश्यक खर्च, दिखावा आणि हुंडा प्रथेबाबत चिंता व्यक्त केली. “आज अनेक गरीब कुटुंबांवर विवाह खर्चाचा मोठा आर्थिक ताण पडत आहे. त्यामुळे प्रत्येक गाव, खेडे आणि तालुक्यात अशा प्रकारचे सामूहिक विवाह आयोजित होणे ही काळाची गरज आहे. तसेच साखरपुड्याच्याच कार्यक्रमात विवाह सोहळा पार पाडण्याची सकारात्मक परंपरा समाजाने सुरू करावी,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजाला कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र शासनाने गौवंश कुर्बानीवर बंदी घातलेली असल्याने कोणत्याही परिस्थितीत गौवंशाची कुर्बानी करू नये तसेच कायद्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विवाहबद्ध झालेली जोडपी
सना शेख गफार शेख, जळगाव — अन्सार बेग दिलावर बेग, भुसावळ
मुस्कान रहीम मनियार, धुळे — शेख शादाब, मुक्ताईनगर
सानिया बी सलीम खान शिकलगार, एरंडोल — शब्बीर खान आसिफ खान, जळगाव
फरीन नाझ, मासुमवाडी — समीर सलीम पटेल, सुप्रीम कॉलनी, जळगाव
सदर विवाह सोहळ्याचे खुत्बा-ए-निकाह भुसावळ येथील मौलाना अलीम रजा आणि मौलाना मोहम्मद यांनी सादर केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, सचिव अजिज सर, उपाध्यक्ष हकीम चौधरी, जमील सौदागर, शेख मेहमूद चाचा, असलम सर, रऊफ टेलर, साबीर मेंबर, सलीम शेठ, हाफिज करीम, हाजी आरिफ, कलीम मेंबर, नसीब मुन्नाभाई, इब्राहिम पटेल, साहिल पटेल, मुक्ताईनगरचे नगरसेवक सुरेश भाऊ भापसे, रवी भाऊ सोनवणे, बाळादादा सोनवणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शेख तनवीर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष डॉ. फिरोज शेख यांनी मानले.
आयोजनासाठी विशेष परिश्रम
हा सामूहिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. फिरोज शेख यांच्या नेतृत्वाखाली फारुख शेख, आसिफ शेख, अखिल शेख, शेख अजीज, नूर मोहम्मद, सय्यद रईस, अकील खान, शेख अफजल, अब्दुल रब, तन्वीर, रहमत, मुर्तुजा शेख, शेख फिरोज आणि अब्दुल रहमान यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमातून समाजात साधेपणा, धार्मिक मूल्यांचे पालन, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा अत्यंत सकारात्मक संदेश देण्यात आला. आजच्या काळात अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज असून हा विवाह सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.





