एरंडोल :- दोन गटात झालेल्या हाणामारीत ताब्यात घेतलेल्या संशयिताला आमच्या ताब्यात देण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या गटातील टोळक्याने हातात लाठ्याकाठ्या घेवून येत पोलिसांवर भ्याड हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील विखरण येथे घडली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांच्यासह पोलीस पाटील विनायक पाटील गंभीर जखमी झाले आहे.
तसेच जमावाने केलेल्या हल्ल्यातवाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले असून याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.एरंडोल तालुक्यातील विखरण येथे सध्या कांदा काढणीचे काम सुरु आहे. दहिगाव येथील कांदा व्यापारी किशोर पाटील हे कांदा भरण्यासाठी विखरण येथून मजूर घेवून गेले होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास कांद्याच्या गोण्या घेवून जात असतांना चोरटकी विखरण रस्त्यावर चारते पाच गोण्या खाली पडल्या. त्या पडलेलया गोण्या पाहण्यासाठी मजूर खाली उतरले. त्यांनी गावातील काही तरुणांकडे याबाबत विचापरूस केली असता. त्या तरुणांसह मजूरांमध्ये वाद होवून हाणामारी झाली. त्यानंतर चोरटक्की येथील युवक हातात लाठ्याकाठ्या घेवून विखरण येथे आले.
यावेळी पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस देखील त्यांनी सागर चौधरी या मजूराला ताब्यात घेत वाहनात बसविले होते.चोरटकी येथील युवक हातात लाठ्याकाठ्या घेवून गावात दहशत माजवित होते. त्यांनी गावातील आबा महाजन व सावकार महाजन यांना मारहाण केली. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाला आमच्या ताब्यात द्या म्हणत त्यांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला. निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी हे गंभीर जखमी झाले.
पोलिसांवर जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी अतिरीक्त पोलिसांचा बंदोबस्त मागवून घेतला. त्यांनी विखरण व चोरटक्की गावातील जमावाला शांत करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. या दोन्ही गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून याठिकाणी तणावपुर्ण शांतता आहे.