जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल ; पुरवठा विभागाला दिले कार्यवाहीचे निर्देश
जळगाव ;- राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ नाशिक. यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे,यांनी पत्र पाठवून दिपककुमार प्यारेलाल गुप्त यांनी शासनाची दारिद्र्य रेषे खालील असल्याचे भासवून फसवणूक केल्याची तक्रार दिल्यावरून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुरवठा विभागाला याबाबत चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पत्रामध्ये दिपककुमार प्यारेलाल गुप्ता यांच्या विरूद्ध आपले स्तरावरून नियमोचीत कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. तसेच याबाबत चौकशी समिती गठीत करण्याचे म्हटले आहे.
शैलेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारी पत्रात म्हटले आहे कि, दीपक कुमार प्यारेलाल गुप्ता हे त्यांच्या माहिती अधिकार अर्जात ते दारिद्र्यरेषेखाली असले बाबत उल्लेख करत असून त्यांचे शिधापत्रिका वर कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची नोंद नसल्याचे नमूद केले आहेत तसेच दीपक कुमार गुप्ता हे दारिद्र्यरेषेखालील असल्याची खोटी बतावणी करून माहिती अधिकार अर्जात नियमानुसार पि न भरता माहिती अधिकार अर्ज भरून विविध शासकीय कार्यालयात माहिती प्राप्त करून शासनाचा महसूल बुडवून शासनाची दिशाभूल करीत असल्याचे नमूद केले आहे. तसेच दीपक कुमार गुप्ता यांचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादी तपासले असता आढळून आलेले नसल्याबाबत कळविले आहे. दीपक कुमार गुप्ता हे प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी असून त्यांचे अभिलेखात त्यांचे वार्षिक उत्पन्न 24 हजार रुपये मात्र असल्याचे जळगाव तहसील दार कार्यालयात नमूद आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील असल्याचे भासवून माहिती मागणे व त्या माध्यमातून शासनाचा महसूल बुडविणे ही बाब या कार्यालयाच्या अधिकार कक्षेतील नसल्याने याबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करून कार्यवाही करावी असे पत्र जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनीपाठविलेल्या पत्रात जोडले आहे