इतर

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच? लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच? लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता

जळगाव | प्रतिनिधी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना आता मे महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर मे महिन्याचा हप्ता अद्याप प्राप्त न झाल्याने राज्यभरातील महिलांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा प्रलंबित हप्ता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १२ ते १५ जूनदरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यावर १,५०० रुपये जमा होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत शासनाकडून अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, योजनेच्या लाभार्थी यादीबाबतही मोठी चर्चा सुरू आहे. ई-केवायसी प्रक्रिया, कागदपत्रांची पडताळणी आणि पात्रतेच्या निकषांमुळे काही लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ई-केवायसी अपूर्ण असणे, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा योजनेच्या अटी पूर्ण न होणे ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
तथापि, लाभार्थी यादीतील बदलांबाबत आणि वगळण्यात आलेल्या महिलांच्या संख्येबाबत शासनाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी आपल्या बँक खात्याची माहिती, आधार लिंकिंग आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button