इतर

मनपा स्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेत इकरा शाहीनची अभिमानास्पद कामगिरी

मनपा स्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेत इकरा शाहीनची अभिमानास्पद कामगिरी

जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा हौशी कॅरम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या विशेष सहकार्याने आंतर शालेय मनपा स्तरीय कॅरम स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे दिनांक 01 ऑक्टोबर, 2025 रोजी पार पडल्या. या दिवशी 17 वर्षातील मुलं आणि मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या.

यात इकरा शाहीन उर्दू हायस्कूल मधील 2 विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्तरासाठी निवड करण्यात आली.

इकरा शाहीन उर्दू हायस्कूल मधील विजय व निवड झालेले खेळाडू

1) जुनेरा इमरान खाटीक (चौथी )
2) आयशा सिद्दिका शेख रोशन (पाचवी)

विशेष म्हणजे मागच्या वर्षी देखील या दोन्ही विद्यार्थीनी नाशिक येथे विभाग स्तरावर कॅरम खेळण्यासाठी गेल्या होत्या.

या दोन्ही मुली 17 ऑक्टोबर 2025 रोजी नाशिक विभागावर कॅरम खेळण्यासाठी जाणार आहेत.

या यशा बद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार, चेअरमन डॉक्टर मोहम्मद ताहेर शेख, इरफान सालार, मुख्याध्यापक काझी जमीरुद्दीन, शेख जाकीर बशीर, क्रीडा शिक्षक शेख बरकत अली, शेख रोशन, शेख साबीर, सय्यद मंजूर इलाही, इफ्तेखार सर व खान यास्मिन तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button