खान्देशगुन्हेजळगांव

गेंदालाल मिल परिसरात तलवार घेऊन दहशत; २५ वर्षीय तरुणावर पोलिसांची कारवाई

गेंदालाल मिल परिसरात तलवार घेऊन दहशत; २५ वर्षीय तरुणावर पोलिसांची कारवाई

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील गेंदालाल मिल परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५ वर्षीय तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. जुबेर उर्फ डबल भिकन शेख (वय २५, रा. गेंदालाल मिल परिसर) असे संशयिताचे नाव असून, १६ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार अक्रम शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button