
७७व्या भारतीय संविधान गौरव दिनी फैजपुर न.पा.नगराध्यक्ष दालनात संविधान अर्पण तैलचित्राचे अनावरण
फैजपुर प्रतिनिधी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ७७व्या भारतीय संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून फैजपुर नगपरिषदेच्या नगराध्यक्ष यांच्या दालनात फैजपुर येथील भिमपुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पप्पु मेढे यांनी त्यांचे आजोबा स्मृतिशेष. गोवर्धन यादव मेढे माजी नगरसेवक न.पा.फैजपुर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संविधान अर्पण तैलचित्र भेट देण्यात आले तैलचित्राचे अनावरण फैजपुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.दामिनी पवन सराफ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,कार्यक्रमाच्या सुरवातीला बौद्धचार्य बी.डी.महाले सर यांनी भिम स्मरण,भिम स्तुति या पवित्र गाथांचे पठण करून तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून संविधान अर्पण तैलचित्र नगराध्यक्ष यांच्या दालनात लावण्यात आले,

तसेच कार्यक्रमाला उपस्थित समस्त बौद्ध पंच ट्रस्टचे माजी अध्यक्ष भिमराव मेढे,शेख ईरफान नगरसेवक,महेंद्र मंडवाले नगरसेवक,कुर्बान शेख माजी प्र.नगराध्यक्ष,पवन सराफ नगरसेवक,सागर होले नगरसेवक,फैजपुर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी हेमंत ठाकरे साहेब,डॉ.दानिश शेख,सुरेश मेढे,प्रकाश मेढे,वसुंधरा मेढे,निर्मला मेढे,रुपाली मेढे,अनिता मेढे,दिव्या वाघ,अनिल मेढे,धनराज मेढे,दिपक वाघ,संजय मेढे,बाळा भालेराव,राजु वाघ,धीरज मेढे,सागर भालेराव,योगराज मेढे,चंद्रमनी मेढे,बंडू तायडे,यांच्या सह फैजपुर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद व भिमपुत्र ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितीतांचे आभार भिमपुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पप्पु मेढे यांनी मानले.




