जळगाव, प्रतिनिधी. ;- इकरा एज्युकेशन सोसायटीच्या इकरा शाहीन कनिष्ठ महाविद्यालयात फूड फेस्टिव्हलचे 20 डिसेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेतील मुलांनी विविध प्रकारच्या उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, चायनीज व इतर पदार्थांचे 15 हून अधिक स्टॉल लावले होते. यावेळी डॉ.करीम सालार म्हणाले की, या प्रकारच्या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये व्यवस्थापन क्षमता विकसित होण्यास मदत होते. फूड फेस्टिव्हलमध्ये आलेल्या शिक्षकांच्या ग्रुपने मुलांनी तयार केलेले पदार्थ खरेदी करून आनंद लुटला. फूड फेस्टिवल मध्ये मुलींनी अप्रतिम कुकिंग स्किल्स दाखवले. व्यवसाय करण्याच्या युक्त्याही शिकल्या. यावेळी शाळेचे प्रभारी शेख जाकीर बशीर सर म्हणाले की, अशा कार्यक्रमांमधून मुलांना गणित, खरेदी-विक्रीचे नियम, नफा-तोटा आणि प्रमाणाचे नियमही शिकायला मिळतात. याप्रसंगी सोसायटी सदस्य व इकरा आयटीआयचे अध्यक्ष मजीद ढकेरिया साहेब, इक्रा शाहीनचे अमिर सोहेल सर, मसूद सर, काझी अजीमुद्दीन सर, मुस्तकीम खान सर, सोहेल शकील सर, शगुफ्ता मिस, गजाला मिस, फिरस्त मिस, सादिया मिस, सुमैया मिस. , नाजमीन मिस, इकरा बीएड अजीम सर आणि प्रशिक्षणार्थी शिक्षक, इक्रा शाहीन उर्दू हायस्कूलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी इक्रा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष इकबाल शाह सर, इकरा शाहीन कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.ताहिर शेख साहब, सचिव इजाज मलिक साहब, इकरा उर्दू हायस्कूल सालार चेअरमन जफर शेख सर आणि इकरा डी.एड चेअरमन रशीद शेख सर, व इक्रा. शाहीन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य काझी जमीर सर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.