जळगाव : तालुक्यातील चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी तीन चोरटयांसह साहित्य विकत घेणारा असे एकूण चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साहित्य जप्त केले आहे.
जळगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात वैद्यकीय संकुलाचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणाहून स्केअर ट्यूब, चॅनल, स्टील रॉड असे साहित्य चोरी झाल्याची घटना शनिवार घडली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्टोअरकिपर नितीन धाईतडक यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात तपासाधिकारी अल्ताफ पठाण यांच्यासह पोलिस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना एका भंगार व्यवसायिकाकडे
लोखो रुपयांचे साहित्य तीन तरुणांनी विक्रीला आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. भंगार व्यावसायिकासह
चोरटे गजाआड
पथकाने भंगार व्यवसायिकांच्या दुकानावर तपासणी केली असता चोरीस गेलेले साहित्य आढळून आले. भंगार व्यवसायिक विनायक प्रकाश शेरे (वय २९, रा.
सुप्रीम कॉलनी) याची चौकशी केली असता त्याने हे साहित्य गौरव कैलास चव्हाण (वय १९, रा. मोहाडी), दीपक भावलाल नन्नवरे (वय २७, रा. मोहाडी), उमेश विनोद चव्हाण (वय २५, रा. उमाळा) या तिघांनी २५ हजार रुपयांमध्ये विक्री केल्याचे सांगिल्यावरुन पोलिस पथकाने तिघांचा शोध घेत अटक केली.
या पथकाची कारवाई गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहे कॉ अल्ताफ पठाण, पोलिस नाईक योगेश बारी, सचिन पाटील, पोकॉ राहुल रगडे व विशाल कोळी यांच्या पथकाने केली. अटकेतील संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांना न्यायलायात हजर केले असता चौघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.