खान्देशजळगांव

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; ६५ हजारांचा ऐवज लंपास

एमआयडीसी परिसरातील घटना; मास्क लावून आलेले दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; ६५ हजारांचा ऐवज लंपास

एमआयडीसी परिसरातील घटना; मास्क लावून आलेले दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव प्रतिनिधी  : कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. यात ४५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या तीन मूर्ती आणि २० हजार रुपये किमतीच्या लॅपटॉपचा समावेश आहे. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी २३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरातील डी-११० सेक्टरमध्ये सम्राट अविनाश शर्मा (वय ४५) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शर्मा हे कुटुंबीयांसह ९ नोव्हेंबर रोजी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या तीन मूर्ती असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, शर्मा कुटुंबीय बाहेरगावी असताना त्यांचे नातेवाईक घरी गेले असता घराचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ याबाबत सम्राट शर्मा यांना माहिती दिली. देवदर्शनावरून घरी परतल्यानंतर शर्मा यांनी २३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मास्क लावलेले दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद

घरफोडीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये तोंडाला मास्क लावलेले दोन संशयित दिसून येत आहेत. पोलिसांकडून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण चौधरी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button