खान्देशगुन्हेजळगांव

शिवाजीनगर गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल; तीन जणांना अटक

शिवाजीनगर गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल; तीन जणांना अटक

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील शिवाजीनगर परिसरात झालेल्या गोळीबारप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आसोदा शिवारातून तीन संशयितांना अटक केली आहे.

सुरेखा कैलास पंधारे (वय ५०, रा. शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच जण त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी सुरेखा पंधारे यांचा मुलगा केयूर कैलास पंधारे याला जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी एकाने त्यांच्या दिशेने गोळी झाडली, तर दुसऱ्याने तलवार काढून दहशत पसरवली.

या घटनेप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना केले होते. या पथकाने आसोदा शिवारातून तीन संशयितांना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button