
जळगाव : – विद्युत डीपीवर भरधाव दुचाकी धडकून झालेल्या अपघातात शिरसोली येथील कबीर भिका चव्हाण (44, शिरसोली) यांचा मृत्यू झाला. ही घटना नेहरु नगर परिसरात रविवार, 10 मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
जैन व्हॅली कंपनीमध्ये कामाला असलेले कबीर चव्हाण रविवारी जळगावहून किराणा साहित्य घेऊन दुचाकीने शिरसोली येथे घरी निघाले होते. नेहरु नगर परिसरात त्यांची दुचाकी (एम.एच.19 सी.एम. 9151) विद्युत डीपीला धडकली.
या अपघातात त्यांना जबर दुखापत झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.