हैदराबाद (वृत्त संस्था)अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
पुष्पा 2 च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लू अर्जुनला यापूर्वी याच प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि आता त्याला 14 दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पुष्पा 2 स्टारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.