खान्देशजळगांवसामाजिक

रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) : – इगतपुरीपासून भंडारा-गोंदियापर्यंत विस्तारलेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३०३०च्या प्रांतपालपदी शहरातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील यांची (२०२६ – २७) साठी निवड झाली आहे. नाशिक येथील कॉन्फरन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत डॉ.राजेश पाटील यांनी त्यांचे विरोधकांचा ३२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत डॉ. पाटील यांना ११८ मते मिळालीत तर विरोधी उमेदवारास केवळ ८६ मते मिळाली.

जळगावातील प्रतिथयश बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिध्द असलेल्या डॉ.राजेश पाटील यांचे आकाशवाणी चौकात विश्वप्रभा हॉस्पिटल आहे. २०१७ – १८ मध्ये ते जळगाव नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक, तसेच २०१८ – १९ मध्ये आयएपी जळगावचे प्रेसिडेंट, २०१६ – १७ मध्ये जळगाव आयएमएचे सेक्रेटरी तर २०१७ – १८ मध्ये महाराष्ट्र आयएमएचे जॉइन्ट सेक्रेटरी म्हणून कार्य करण्यासोबतच ते रेडक्रॉस सोसायटीचे लाइफ मेंबर आहेत. आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून ते रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे सभासद झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी आपल्या संवाद कौशल्य व कार्यतत्परतेच्या बळावर अल्पावधीतच त्यांनी कम्युनिटी सर्व्हिस मेडीकलचे चेअरमन, मेंबरशिप चेअरमन, ॲडव्हायझरी चेअरमन, क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन, कम्युनिटी सर्व्हिसेस चेअरमन, डिस्ट्रीक्ट ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन, असिस्टंट गर्व्हनर झोन ८, प्रेसिडेंट एनक्लेव्ह चेअरमन आदी महत्वाची पदे भूषविण्यासोबतच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे २०११ – १२ मध्ये प्रेसिडेंट म्हणून कार्य केले आहे. त्यांनी आपल्या रोटरीच्या कार्यकाळात अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहे.
त्यांच्या कार्याचा धडाका व जनसंपर्क पाहता त्यांच्याकडे आलेली प्रांतपालपदाची जबाबदारीही ते लिलया पेलतील व रोटरीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीला नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास व्यक्त होत त्यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button