
अमळनेर येथे एका व्यक्तीचा झोपेत मृत्यू
अमळनेर प्रतिनिधी मोकळ्या जागेवर राहणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय हेमराज सोनवणे पांचाळ (वय ५२) असे मृताचे नाव असून तो आपल्या आई व दोन मुलांसह जुना बस स्टैंड परिसरात वास्तव्यास होता.
त्याची पत्नी धुळे येथे असते. संजय व त्याची आईयांचा शेती उपयोगी अवजारे बनविण्याचा व दुरुस्तीचा पिढीजात व्यवसाय आहे. अमळनेर शहरात अतिक्रमित जागेत वास्तव्यास असताना पालिकेच्या माध्यमातून तेथील अतिक्रमण काढले गेल्याने हे कुटुंब बेघर झाले होते.मात्र शासनाकडून घरकुलाचा लाभ न मिळाल्याने जुना बस स्टैंड परिसरात रस्त्यालगत त्यांनी चस्तान मांडून तेथेच ते दिवसा व्यवसाय करून रात्री वास्तव्य करत होते. सध्या थंडीचा गारठा वाढल्याने अश्यात संजय यांचा रात्री झोपेतच मृत्यू झाला.