इतर

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

महिलांच्या हस्ते ध्वजारोहण; कर्तृत्वाचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. सह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अधोरेखित करत विविध ठिकाणी महिला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जैन प्लास्टिक पार्क येथे डॉ. सीमा जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या समारोह प्रसंगी जैन परिवारातील सदस्य म्हणून सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन , फूडपार्क येथे प्रा. शुभदा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, येथे अभेद्य जैन उपस्थित होते. तर जैन अॅग्री पार्क-गांधी तीर्थ येथे डॉ. सुमन लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन व आत्मन जैन उपस्थित होते. हायटेक प्लॉन्ट फॅक्टरी टाकरखेडा येथे डॉ. शमा सराफ यांच्या ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी अभय जैन उपस्थित होते. अनुभूती रेसिडेन्सी स्कूल येथे डॉ. मृणालिनी फडणवीस त्यावेळी संचालिका निशा जैन, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रायमरी येथे डॉ. आरती हुजरबाजार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शोभना अजित जैन उपस्थित होत्या. तर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल सेकंडरी येथे हेमा अमळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी सुनंदा जैन उपस्थित होत्या. वाकोद येथे डॉ. कल्याणी मोहरीर, कांताई नेत्रालय येथे डॉ. सोनाली महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सदस्य म्हणून डॉ. अंशू ओसवाल, भाऊंचे उद्यान येथे हेमांगिनी सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी सतीश ओसवाल उपस्थित होते. महात्मा गांधी उद्यान येथे डॉ. अर्पणा भट यांनी ध्वजारोहण केले. परिवारातील सदस्य सुरेश जैन उपस्थित होते. कांताई सभागृह येथे नलिनी मल्हारा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी हर्षद जैन उपस्थित होते. कांताई बंधारा येथे तुळजाबाई नन्नवरे, उपसरपंच (बांभोरी) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी जैन परिवारातील सदस्य म्हणून अंकूर जैन उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये करण्यात आले. दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते जैन उद्योग समूहाच्या १३ आस्थापनांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते .

कोट

“महिलांनी आज शिक्षण, उद्योग, शेती, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, सामाजिक कार्य अशा सर्वच क्षेत्रांत आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान महिलांना देण्यात आला. महिलांना समान संधी आणि सन्मान मिळाल्यास त्या राष्ट्रनिर्मितीत आणखी मोठे योगदान देऊ शकतात. महिला सशक्तीकरणातूनच सक्षम समाज आणि प्रगत राष्ट्राची निर्मिती शक्य आहे.”

– अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button