
संविधान दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांनी घेतली संविधानाच्या उद्देशिकेची शपथ
जळगाव : इक़रा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्याची तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाला इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, डॉ. अब्दुल करीम सालार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. इरफान शेख, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. हाफिज शेख, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरदौस शेख, डॉ. तनवीर खान, डॉ. कुलकर्णी, डॉ. युसुफ पटेल, डॉ. चांद खान, प्रा. काझी मुजम्मिल, डॉ. अमीन काझी, प्रा. राजू गवरे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेतील जबाबदारी याविषयी जाणीव करून देण्यात आली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




