खान्देशगुन्हेजळगांव

गावठी कट्ट्यासह युवकाला अटक 

गावठी कट्ट्यासह युवकाला अटक 

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; कुसुंबा शिवारातील घटना

जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई २ मे रोजी करण्यात आली असून, संबंधित चेतन वसंता देवुळकार (वय २२, रा. कुसुंबा) याच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नाईक गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चेतन देवुळकार हा गावठी बनावटीचा कट्टा बेकायदेशीररीत्या बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कुसुंबा शिवारात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून गावठी कट्टा मिळून आला. पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून देवुळकारला अटक केली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button