
धरणगाव-चोपडा रस्त्यावरील घटना
धरणगाव;- दुचाकीला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना आज २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ घडली . दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला . युवराज महाजन (55, रा.विखरण, ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे.
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि युवराज महाजन हे दुचाकी (एम.एच.19-4490) वरून सहकार्यासोबत जात असताना धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी गंभीर जखमी झाले.अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला.
माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गोपाल पाटील, अमोल चौधरी, गौतम सोनवणे, विनोद रोकडे, गजानन महाजन आदींनी धाव घेत जखमीला उपचारार्थ हलवले.याबाबत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.