खान्देशजळगांव

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन

जळगाव : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांसह देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर पोलीस अधिकारी आणि जवानांना गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी दहशतवादाचा आणि पाकिस्तानचा निषेध केला. हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन दोन मिनिटे स्तब्ध उभे राहत शहीदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सै. अयाज अली नियाज अली, राहुल चौधरी, हाजी शकूर बादशाह, हाजी अकबर अली, हाजी शेख सलीमउद्दीन, हाजी अब्दुल रहीम, नितीन शिंपी, योगेश मराठे, शफी शेख, रवींद्र खैरनार, यासिन कुरेशी, अब्दुल रहेमान, युसूफ नागोरी, अझीझ इब्राहिम, मोहसीन कुरेशी, मुकेश सेठीया, शेख रमजान, फैझान रहेमान, मोहम्मद नईम, परिमल मुझुमदार, मोईन कुरेशी, जावेद बागवान, अयान अलीम, झिशान हुसैन, अशफाक खान, जावेद अय्युब, अब्दुल्लाह बशीर, वसीम अहेमद यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button