
यावल येथील निष्पाप हन्नान खान या मुलाच्या मारेकरीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी
सावदा येथील नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी
शेख मुख्तार I खान्देश टाइम्स न्यूज
सावदा :- जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात असलेल्या बाबूजी पुरा भागात निष्पाप ६ वर्षाच्या हन्नान खान या मुलाचे अतिशय क्रूरपणे अपहरण करून हत्या करण्यात आली.या हृदयद्रावक घटना मुळे संपूर्ण समाज हादरवून गेला.
तरी या घृणास्पद गंभीर स्वरुपाचा गुन्हा जाणीवपूर्वक करणाऱ्या बिस्मिल्ला खलिफा दस्तगीर खलिफा याला मृत्युदंडाची शिक्षा व्हावी.यासाठी गुन्ह्याचा तपास थेट(एसआयटी)मार्फत करण्यात यावे.दोषारोपत्र ३० दिवसात सादर करण्याची उपाययोजना केली जावी. सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.पिडीत कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी.अशी विनंती वजा मागणी दि.७ सप्टेंबर २०२५ रोजी सावदा पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना समक्ष भेटून,या माध्यमातून शासन दरबारी निवदानाद्वारे महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी फरीद शेख,युसूफ शाह,नविन सुन्नी मुस्लिम कब्रस्ताना कमिटीचे अध्यक्ष कलिम जनाब, शहिद अब्दुल हमीद स्मारक संस्थाचे अध्यक्ष शेख मुख्तार,शेख मोईन(लाला),बाबू रिक्षा वाले,शेख इरफान(केजरीवाल)इत्यादीने केली आहे.तरी सदरच्या गंभीर प्रकरणा बाबत अपल्या मागणीचे निवेदन तात्काळ आमच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात येईल.असे ठोस आश्वासन सहा.पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी सदरील निवेदनकर्त्यांना यावेळी दिले.





