मुंबई;- पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्यानं घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून, नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे. या कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपये खर्चासही सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.