जळगाव : – दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी एका वृद्धाच्या गळ्यात टांगलेली पैसे असलेली बॅग हिसकावून धूमस्टाईलने पोबारा केल्याची घटना शनिवारी ६ रोजी रात्री घडली . याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि , असोदा येथील रहिवाशी मकबुल शब्बीर पिंजारी (वय ४६) हे गेल्या ३५ वर्षांपासून किशोर शांताराम राव यांच्या गरजपुर्ती स्टेशनरी व होलसेल दुकानातील वसुलीचे काम पाहत असून त्यासाठी ते दिवसभर मालाची वसुली करतात . नंतर रात्री वसुल झालेली रोकड आणि दुचाकी मालकाच्या घरी त्यांच्याकडे सुपुर्द करीत घरी निघून जातात. मकबुल पिंजारी शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे दिवसभर दुकानांमध्ये जाऊन वसुली केली. वसुल केलेली सुमारे ३२ हजारांची रोकड आणि ग्राहकांनी दिलेले धनादेव व रिसीट बुक घेवून पिंजारी हे गोलाणी मार्केटमधून प्रतापनगरकडे मालकाच्या घरी जाण्यासाठी निघाले. मालकाच्या घरी पोहचल्यानंतर ते दुचाकीवरुन खाली उतरत असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी बॅग खेचली परंतू पिंजारी यांनी बॅग घट्ट पकडून ठेवत जोरजोरात आरडाओरड केली. याचवेळी दुसरे दुचाकीस्वार दोन तरुण तेथे आले. ते देखील पिंजारी यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने ओढून ते चौघे तेथून पसार झाले.हि घटना त्यांनी मालकाला सांगितली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, मात्र रात्रीची वेळ असल्याने चोरटे त्यामध्ये अस्पषट कैद झाले आहे. याप्रकरणी पिंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.