खान्देशगुन्हेजळगांवशिक्षणसामाजिक

गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी :
‘एसडी-सीड’ शिष्यवृत्ती अर्जाची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत

जळगाव : गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय    कौशल्य विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी सुरु असलेल्या ‘एसडी-सीड शिष्यवृत्ती २०२५’ ची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.    एसडी-सीडच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लाभ नवीन विद्यार्थ्यांनीही घ्यावा.
एसडी-सीडचे आधारस्तंभ माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या प्रेरणेतून२००८ साली  सुरु झालेल्या या योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील गरजू, जिल्हयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे.

असे आहेत शिष्यवृत्ती पात्रता निकष:
विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा अधिक नसावे. दहावीत ग्रामीण विभागातील विद्यार्थी किमान ८५ टक्के गुण तर शहरी विभाग ९० टक्के गुण, बारावीत ग्रामीण विभागातील विद्यार्थी किमान ७० टक्के गुण तर शहरी विभाग ७५ टक्के गुण, सीईटी, सीपीटी, नीट, जेईई समकक्ष परीक्षेत उत्तम गुण असावे. दिव्यांग, एकल पालक, निराधार विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होईल.शासकीय व खाजगी महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर….
अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी www.sdseed.in  या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर पोच पावतीची प्रिंट घेऊन त्यासोबत आवश्यक व बंधनकारक असणारी सर्व कागदपत्रे जोडून विद्यार्थ्यांनी ते एसडी-सीड कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पाठवावी.

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एसडी-सीड शिष्यवृत्ती विभाग
शिवाजी नगर, जळगाव (0257-2235254), (9325689244) येथे संपर्क साधावा व योजनेचा आर्थिक दृष्ट्या कमकुवत व  गुणवंत विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख रत्ना जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉक्टर प्रसन्न कुमार रोहिदासने असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button