जळगांवशिक्षणसामाजिक

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे आदर्शवत काम ; गणपतीचे निर्माल्य संकलन करून विघटन

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे आदर्शवत काम ; गणपतीचे निर्माल्य संकलन करून विघटन

मेहरूण तलाव येथील गणपती विसर्जनस्थळी राबविला स्तुत्य उपक्रम ; विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून स्वच्छतेचा संदेश

जळगाव जलप्रदूषण रोखण्यासाठी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरेक्ट क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विध्यार्थ्यातर्फे गणेशोत्सवात ‘निर्माल्य संकलन व विघटन’हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यानी शहरातील मेहरूण तलाव परिसरात जाऊन स्वच्छता केली. तसेच गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य व घरगुती गणपती जवळील निर्माल्य संकलित करून विघटन करण्यात आले.

गणपती विसर्जनासोबतच पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा आणि फुलांचे हार पाण्यात टाकल्यामुळे जलप्रदूषण होते. हे टाळण्यासाठी या उपक्रमांतर्गत निर्माल्याचे योग्य पद्धतीने संकलन व विघटन करून पर्यावरणाचे रक्षण तसेच पूजेचे पावित्र्य जपले गेले. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गणपती विसर्जनाला येणारे भाविक हे, बरोबर आणलेली व पूजेसाठी वापरलेली फुले, दुर्वा, फुलांचे हार, सत्यनारायण पूजेसाठी वापरलेले केळंबे, उदबत्या, कापूर सोबत आणून विसर्जन स्थळीच वाहतात. त्यामुळे हे जलप्रदूषण रोखण्यासाठी या सर्व संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येत असून तयार केलेले खत हे रोपवाटिकेसाठी वापरले जाणार आहे. हा उपक्रम राबविल्याबद्दल जळगाव महानगरपालिकेने जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करीत आभारही मानले.

हा उपक्रम सेजल बाहेती, सुजल परदेशी, प्रियंका शर्मा, गौतम पांडे, स्नेहा बारी, अबोली चौधरी, डिंपल जंगले, राहुल सुरवाडे, तेजस पाटील, रिचर्ड पिंन्टो, चेतना काकडे, रोशनी जैन, आयुष धूत, खुशाल अग्रवाल, वैभव सांगोळे, रेणुका देवेंद्र, प्रांजल हरताळकर, विवेक भंगाळे, नेहा वाणी, मोनालिसा साहू, आयुष म्हस्के, आदित्य टोप्पो, सात्विक दीक्षित, मयंक ठाकूर, निशांत शर्मा, वैष्णवी घुगे, गायत्री खाचणे, मयूर यादव, रोहन सहानी, राहुल यादव, आदित्य बाफना आदी महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी राबविला तर या उपक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा, प्रा. अमोल जोशी व प्रा. वसीम पटेल यांनी साधले तसेच सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनिलजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button