जळगाव;- रिक्षात कलर घेवून मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरात होती की पुढे चालणारी रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर (वय ३०, रा. बोरखेडी ता. मोताळा, जि. बुलढाणा) या जागीच ठार झाल्या.
जळगावकडून (एमएच १९ बीयू ५८४३ ) क्रमांकाच्या प्रवासी रिक्षातून प्रवासी कलर घेवून बुधवारी सायंकाळच्या सुमारास भुसावळकडे जात होते. याचवेळी मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ इए ५१०९) क्रमांकाच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही
चार प्रवासी गंभीर जखमी झाले. घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर घडली. कारने दिलेली धडक इतकी जोरात होती की, रिक्षा उलटून रिक्षातील प्रवासी महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत्यांच्यासोबत असलेली इतर चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्र्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात रिक्षातील जुबेर शेख मेहबुब शेख (वय ४०), करीम बेग शरीफ बेग (वय २९), शेख सादीक शेख इसार (४०) व शेख उमेमा शेख जुबेर (वय ६) हे चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरु होते.