
जळगाव प्रतिनिधी I श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयां मध्ये14 सप्टेंबर हिंदी दिवसा निमित्त हिंदी मंडळा तर्फे उपशिक्षिका उज्वला नन्नवरे यांच्या मार्गदर्शना खाली हिंदी दिवसा निमित्त विविधते मध्ये एकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला .शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेवुन राष्ट्रभाषेचा सन्मान केला,
उपशिक्षिका शितल कोळी यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले की, हिंदी दिवस दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी भारतातील शाळा, आणि विविध संस्थांमध्ये साजरा केला जातो. १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने घेतलेला निर्णय, भारताची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार करण्याचा हा दिवस आहे
. हिंदी ही एकता आणि संस्कृतीची भाषा आहे. ती केवळ आपली राष्ट्रभाषा नसून आपल्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांनी सर्वांना हिंदीच्या प्रसार आणि प्रचारासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.शेवटी, शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सर्व सहभागी, शिक्षक आणि आयोजक समितीचे आभार मानले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.





