जळगाव l ८ ऑगस्ट २०२३ l औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींसाठी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरिता १४ ऑगस्ट रोजी मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTRI) संस्थेच्या वतीने शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास शिकाऊ उमेदवारी योजनेत प्रशिक्षणास इच्छूक उमेदवारांनी १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे.
पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्यस भाग घेण्यासाठी संबंधित आस्थापना तसेच [ITI] उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी Apprenticeshipindia.org या वेबपोर्टलवर नाव नोंदणी करावी. असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.