
जळगाव प्रतिनिधी फैजपूर येथील सेवानिवृत्त फौजदार शेख शकील शेख दगू यांची चार जणांनी फसवणूक केल्याची तक्रार फैजपूर पोलीस स्टेशनला दिलेली असता संबंधित चौघांवर अध्यापही गुन्हा न दाखल झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता जिल्हा पेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
शकील शेख यांनी म्हटले आहे की कुसुंबा शिवारातील येथील रहिवासी असलेले इरफान शेख कामिल मोमीन, हिना कैसर इरफान शेख ,शेख काबिल मोमीन व शेख याकूब शेख आयुब उर्फ टेलर या चौघांनी अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे 30 जून 2025 रोजी फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सोबत त्यांनी याबाबत पुरावे देखील सादर केले असताना संबधीनतांवर अद्यापही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
मात्र फैजपूर पोलिसांनी त्यांना आश्वासन दिल्याने त्यांनी तो निर्णय टाळला. मात्र काही दिवस उलटून देखील गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी 16 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता जिल्हा पेठ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
शेख शकील यांनी तक्रारीत पोलिसांवर संगनमताचा आरोप करताना म्हटले आहे की, “मी निवृत्तीवेतनधारक असून माझ्या कष्टाच्या पैशांची फसवणूक झाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये वारंवार चौकशी करूनही नेहमी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. काही पोलिस आरोपींचे उघडपणे सहकार्य करीत आहेत.”न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त. केली.
दरम्यान शेख शकील शेख दगु यांनी अडीच लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.





