खान्देशजळगांवसामाजिक

सोन्या-चांदीच्या किमतीत घट ; ग्राहकांना दिलासा!

जाणून घ्या जळगावच्या सराफ बाजारातील दर

सोन्या-चांदीच्या किमतीत घट ; ग्राहकांना दिलासा!

जाणून घ्या जळगावच्या सराफ बाजारातील दर

जळगाव प्रतिनिधी I जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आज बुधवारी सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति तोळा ५०० रुपयांची तर चांदीत प्रति किलो १००० रुपयांची घसरण झाली. काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे ग्राहक चिंतेत होते, मात्र आजच्या घसरणीमुळे सणासुदीच्या खरेदीसाठी हा योग्य काळ असल्याचे मानले जात आहे.

आजच्या घसरणीनंतर २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी १,०१,२२० रुपये (जीएसटीसह १,०४,२५६ रुपये) प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला आहे. तर २४ कॅरेट सोने १,१०,५०० रुपये (जीएसटीसह १,१३,८१५ रुपये) इतक्या दराने उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वीच सोन्याचा दर १,१४,००० रुपयांवर पोहोचला होता आणि तो आतापर्यंतचा सर्वाधिक दर ठरला होता.

दरम्यान, चांदीचा दरही खाली आला असून आज विनाजीएसटी १,२९,००० रुपये (जीएसटीसह १,३२,८७० रुपये) प्रति किलो इतका आहे. काल हा दर १,३०,००० रुपयांवर होता.

सोन्या-चांदीच्या दरातील या चढउतारामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारपेठेतील बदल, अमेरिकन डॉलरची ताकद, आयात खर्च, व्याजदर, महागाई तसेच मागणी-पुरवठा या सर्व घटकांचा सोन्याच्या भावावर परिणाम होतो. उच्च चलनवाढीच्या काळात सोन्याची मागणी वाढते आणि त्यामुळे किमतीही उंचावतात. आंतरराष्ट्रीय स्पॉट किमतीतील बदल देखील भारतीय बाजारावर थेट परिणाम करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button