खान्देशजळगांव

जुन्या वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून; एक संशयित ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू

जुन्या वादातून २७ वर्षीय तरुणाचा खून; एक संशयित ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू

कासमवाडी परिसरातील घटना

जळगाव प्रतिनिधी कासमवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास जुन्या वैमनस्यातून झालेल्या क्रूर हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका जाधव (वय २७, रा. कासमवाडी) याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका संशयिताला ताब्यात घेतले असून, फरार दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.

नाना जाधव याचा परिसरातील काही व्यक्तींशी पूर्वीपासून वाद होता. दसऱ्याच्या रात्री तो एकता म itr मंडळाजवळ उभा असताना, दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. जुन्या रागातून त्यांनी धारदार शस्त्राने नानाच्या पोटात आणि मांडीवर अनेक वार केले. गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी त्याला दुचाकीवरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अतीदक्षता विभागात उपचार सुरू असताना, गंभीर जखमांमुळे अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकांनी रुग्णालयात आक्रोश केला, आणि परिसरात जमलेल्या गर्दीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि खुनाचा गुन्हा दाखल केला.

स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती देत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि वैमनस्याचे मूळ शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे कासमवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button