
मास्टर ऑफ फार्मसी मध्ये ८५.८१ गुण प्राप्त करून महेक पठाण ठरली कॉलेज टॉपर!
सावदा प्रतिनिधी मुख्तार शेख
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरातील माजी नगरसेवक फिरोज खान हबीबुला खान पठाण यांची सुपुत्री मेहेक पठाण हिने शैक्षणिक क्षेत्रात नुकतेच दर्जेदार यश संपादन केले.सदरील उत्कृष्ट कामगिरीने स्वत:च्या कुटुंबासह संपूर्ण सावदा शहराचा गौरव विद्यार्थ्यांनी महेक पठाण यांनी वाढविला आहे.
मेहेक हिने मास्टर ऑफ फार्मसी या पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध रसायनशास्त्र विभागातून थेट ९.०६ सीजीपीए व ८५.८१ टक्के गुणांसह डिस्टिंक्शनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे तिला कॉलेज टॉपर होण्याचा मान मिळाला असून तिच्या यशाने सावदा शहराचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
ही गुणवंत विद्यार्थिनी महेक पठाण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या फैजपूर ता.यावल येथील तापी व्हॅली एज्युकेशन सोसायटी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत होती.
तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सावदा व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजातील विविध मान्यवर, मित्रपरिवार व शिक्षकवर्ग यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
तरी विद्यार्थ्यांनी मेहेक पठाण हिच्या दर्जेदार यशामुळे सावदा शहर व परिसरातील युवक-युवतींना प्रेरणादायी दिशा मिळाली आहे.यात दुमत नाही.
तर महिला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी फरीद शेख व युसूफ शाह यांनी विद्यार्थ्यांनी मेहेक फिरोज खान पठाण यास पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या





