जळगाव ;– आदिवासी टोकरे कोळी ,ढोर कोळी,मल्हार कोळी ,महादेव कोळी जमातीच्या प्रलंबित मागण्यांसाठी १० पासुन सुरु झालेल्या अन्नत्याग उपोषणास सुरुवात केलेली आहे.त्याअनुषंगाने समाजातील प्रत्येक घटक याआंदोलनाला पाठींबा दर्शवित आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जवळजवळ २००० पेक्षा जास्त समाज बांधवांनी व समाजावर प्रेम इतर समाजातील हितचिंतक तसेच सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी यांनी भेट देऊन आमच्या उपोषणकर्त्यांच मनोबल वाढवायला व पाठींबा देण्यासाठी उपस्थिती दर्शविली.त्यातप्रामुख्याने प्रहार संघटनेचे उत्तरमहाराष्ट्र चे नेते अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष श्.संभाजी सोनवणे शहर अध्यक्ष दिनेश कोळी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते राजु सुर्यवंशी,सुदाम सोनवणे,सेवानिवृत्त पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद रायसिंग, सेवानिवृत्त शिक्षण संचालक श्री श्रीधर साळुंके, मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे,बी.टी. बाविस्कर, जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामाभोळे,माजी महापौर भारतीताई सोनवणे, नगरसेवक .कैलास आप्पा सोनवणे हे आमच्या उपोषण कर्त्यान सोबत बराच वेळ उपस्थित होते.राजुमामा भोळे यांनी उपोषणाची दखल घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी आमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा केल्याचे सांगितले .
जमातीचे उपोषण कर्ते जगन्नाथ बापू बाविस्कर (चोपडा), .नितीन कांडेलकर (मुक्ताईनगर),संजय कांडेलकर (मुक्ताईनगर),.नितीन सपकाळे ( अंजाळे), पद्माकर कोळी (यावल), पुंडलिक सोनवणे (भोकर) यांना समाजातील सर्व घटकाकडून पाठींबा देऊन व मनोबल वाढवीत आहे .
उपोषणस्थळी आदिवासी कोळी जमात समन्वय समितीचे मार्गदर्शक डॉ. शांताराम सोनवणे ,प्रमुख प्रभाकर आप्पा सोनवणे(वढोदे), जितेंद्र सपकाळे,प्रल्हाद सोनवणे, संदीप कोळी . दिपक तायडे, सुभाष सोनवणे, विशाल सपकाळे,खेमचंद कोळी, यांच्यासोबत बरेच समाजबांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यालाच अनुसरून समाज प्रबोधनपर व पाठिबा दर्शविण्यासाठी १२ रोजी मोटारसायकल रलीच आयोजन आमच्या समाज बांधवानी केलेले आहे
रॅलीची सुरुवात सकाळी १० वाजता चोपडा ( वाल्मिक नगर ) येथून सुरु होऊन –अडावद- धानोरा- विदगाव- मार्गे जळगाव शहरातील शनिपेठ –वाल्मिकनगर – टावर चौक – महापलिका- कोर्ट चौक –मार्गे उपोषणस्थळी दुपारी दाखल होईल.