खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

देवगिरी बँकेची ५ कोटी ३३ लाखांची फसवणूक; माजी खासदार उन्मेष पाटलांसह चौघांवर गुन्हा

देवगिरी बँकेची ५ कोटी ३३ लाखांची फसवणूक; माजी खासदार उन्मेष पाटलांसह चौघांवर गुन्हा

चाळीसगाव (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह ‘उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या चार संचालकांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

‘उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज (Industrial Loan) न भरल्याने ते एनपीए (Non-Performing Asset) झाले होते. बँकेकडून वारंवार संधी देऊनही कंपनीने कर्जाची परतफेड केली नाही. यानंतर बँकेने कायदेशीर कार्यवाही सुरू केली असता, कर्जापोटी बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी (यंत्रसामग्री) कंपनीच्या संचालकांनी संगनमताने परस्पर विकल्याचा गंभीर आरोप बँकेने केला आहे.

यानुसार, बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमांखाली चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button