
प्रल्हाद सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार
जळगाव : अनुसूचित जमाती व वंचित आदिवासी कोळी समाजासाठी तसेच ऑटोरिक्षा व विद्यार्थी वाहतूक क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रल्हाद सोनवणे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. श्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मीताई कुमावत यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
प्रल्हाद सोनवणे हे आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष तसेच ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यध्यक्ष आणि आक्रमक सामाजिक संघटनेचे सचिव म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांच्या अथक सेवाकार्याची दखल घेत त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले असून विविध सामाजिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.