प्रल्हाद सोनवणे यांची कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभाग संपर्क प्रमुख पदी नियुक्ती
जळगाव (प्रतिनिधी) – समाजकार्य क्षेत्रात सक्रिय असलेले प्रल्हाद सोनवणे यांची कर्तव्यदक्ष पोलिस मित्र फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभाग संपर्क प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल परदेशी यांच्या हस्ते नियुक्ती जाहीर करण्यात आली, तर नियुक्तीपत्र भारतीय जनता पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष श्री. दीपकभाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रल्हाद सोनवणे यांना प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा जळगाव महानगर सरचिटणीस राहुल वाघ, महिला उपाध्यक्षा रेखाताई वर्मा, महिला जिल्हाध्यक्षा नितुताई महेंद्रसिंह परदेशी, महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटी सदस्य व उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री. प्रमोदभाऊ वाणी, जिल्हाध्यक्ष सुरसिंग (सुरेश) पाटील, उत्तर महाराष्ट्र संघटक निताताई भंडारी, जिल्हा कार्याध्यक्ष निलाताई चौधरी, तसेच पुजा विसपुते, योगिता शुक्ल, रत्नाताई बागुल, सुमनताई मराठे, हिमांशू जोशी, महेश शिंपी, विजय अहिरराव, रेखाताई राणा, मधुमती चौधरी, गजानन लाडवंजारी, हरिश कोयते, नारायण पाटील, तुषार नारखेडे, हेमंत पाटील, दत्तात्रय सोनार, उमेश तायडे, दिलीप लाडवंजारी, रवींद्र कोळी आणि रवींद्र दुसाने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रल्हाद सोनवणे यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “संविधानात नमूद केलेल्या समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांनुसार कार्य करत, पोलिस प्रशासन, पोलिस परिवार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समन्वय साधणे आणि अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे.”
सोनवणे यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात ते निस्वार्थ भावनेने कार्य करतील, असा विश्वास फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.