इतरराजकीय

प्रभाग ७ मध्ये ‘स्थानिक’ उमेदवाराचा एल्गार; जितेंद्र चव्हाण दाम्पत्याचा भाजपच्या उमेदवारीवर दावा

जळगाव l २९ डिसेंबर २०२५ l प्रतिनिधी l आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, ‘स्थानिक उमेदवार’ हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. श्री आर्टस् चे संचालक आणि ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र सुभाष चव्हाण व त्यांच्या पत्नी कल्पना जितेंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाकडे आपली उमेदवारी अर्जाद्वारे दाखल केली आहे. यामुळे प्रभागात आता स्थानिक विरुद्ध उपरे असा नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग ७ ला स्थानिक रहिवासी असलेल्या लोकप्रतिनिधीची प्रतीक्षा होती. जितेंद्र चव्हाण हे याच प्रभागातील मूळ रहिवासी असल्याने त्यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन ही उमेदवारी मागितली आहे. श्री आर्टस् संस्थेच्या माध्यमातून कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे तरुणांमध्ये त्यांची मोठी पकड आहे.

“प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक असणे आवश्यक आहे. पक्षाने माझ्यावर किंवा पत्नी कल्पना चव्हाण यांच्यावर विश्वास टाकला, तर आम्ही प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावू,” असा विश्वास जितेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भाजप आता कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button