
संस्कृत मेधा शोध परीक्षेत चाळीसगावच्या विद्यार्थिनींचे यश
जरीन शेख व गौरी सूर्यवंशी यांना ९४ गुण; राज्यस्तरीय परीक्षेत अव्वल कामगिरी
चाळीसगाव : प्रतिनिधी
रविकिर्ती संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संस्कृत मेधा शोध परीक्षा (इयत्ता ९ वी) २०२५–२६ चा निकाल जाहीर झाला असून चाळीसगावच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
राष्ट्रीय कन्या शाळेची विद्यार्थिनी जरीन गफ्फार शेख आणि अभिनव शाळेची गौरी विनोद सूर्यवंशी यांनी १०० पैकी ९४ गुण मिळवत अव्वल कामगिरी केली. चाळीसगाव येथील अनुपम संस्कृत केंद्रातून एकूण ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
राष्ट्रीय कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी तरटे सरांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.




