खान्देशजळगांवराजकीयसामाजिक

रोहित निकम यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव

रोहित निकम यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव

शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थे तर्फे नाशिक येथे सन्मान

जळगाव, प्रतिनिधी
पणन महासंघाचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक रोहित दिलीप निकम यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिकतर्फे राज्यस्तरीय ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४-२५’ प्रदान करण्यात आला.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार सामाजिक कृतज्ञतेसाठी दिला जातो.

नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात ७ मार्च रोजी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात रोहित निकम यांचे बंधू व न्यू सॉफ्टएड कॉम्प्युटरचे संचालक रितेश निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी मंचावर निवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पाटील, महापौर हिमगौरी आडके-आहिर, शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार, हेमंत धात्रक, संतोष मराठे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील हे मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जगन्नाथ पाटील यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button