
टेन्ट व्यावसायिकाने घेतला टोकाचा निर्णय …
वरणगाव शहरातील घटना
वरणगाव, प्रतिनिधी
वरणगावातील मकरंद नगर भागातील रहिवासी असलेल्या टेन्ट व्यावसायिकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना११ मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली. सुधीर लीलाधर पाटील (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुधीर पाटील यांचा यांचा टेन्ट हाऊसचा व्यवसाय होता. मात्र, काही दिवसापासून त्यांची मानसिक स्थिती उत्तम नव्हती, यातच त्यांनी मकरंद नगरमधील आपल्या राहत्या घरच्या छताला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
या घटनेची माहिती मयताचे मोठे भाऊ सतीष पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.हे.कॉ. प्रमोद कंखरे करत आहेत.