खान्देशजळगांवसामाजिक

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांना दिलासा

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांना दिलासा

प्रति तोळा सोनं ९८० रुपयांनी स्वस्त

जळगाव : जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली असतानाच देशांतर्गत सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट नोंदवली गेल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सराफ बाजारातील माहितीनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९८० रुपयांनी घसरून १ लाख ६१ हजार २४० रुपयांवर आला आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९०० रुपयांनी कमी होऊन १ लाख ४७ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७४० रुपयांनी घटून १ लाख २० हजार ९३० रुपये इतका झाला आहे.
दरम्यान, सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही किरकोळ घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो १०० रुपयांनी कमी होऊन २ लाख ७९ हजार ९०० रुपयांवर पोहोचला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दरकपातीमुळे ग्राहकांमध्ये खरेदीबाबत उत्सुकता वाढली असली, तरी सोन्याचे दर अद्याप दीड लाखांच्या पुढे असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण कायम असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button