खान्देशगुन्हेजळगांव

धक्कादायक! जळगावमध्ये ३१ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार

धक्कादायक! जळगावमध्ये ३१ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार

​गुंगीचे पेय देऊन नराधमांचे पाशवी कृत्य; एमआयडीसी पोलिसांकडून मुख्य आरोपीला बेड्या

​जळगाव (प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका ३१ वर्षीय विवाहित महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका नराधमाला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रामेश्वर कॉलनी परिसरात वास्तव्यास आहे. १३ मार्चच्या रात्री ११:३० ते १४ मार्चच्या पहाटे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेचे नातेवाईक असलेल्या राजेश शिवराम पवार आणि राजेंद्र शंकरसिंह पवार या दोघांनी तिला गाठले. यावेळी मुख्य आरोपी राजेश पवार याने पीडितेला गुंगीचे पेय पिण्यास दिले. त्यानंतर पीडित महिला शुद्ध हरपलेल्या अवस्थेत असताना, या दोन्ही नराधमांनी तिच्यावर संमतीशिवाय आळीपाळीने अत्याचार केला.

​अत्याचाराच्या या घटनेनंतर पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. प्रकृती खालावल्यामुळे पीडितेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सपोनि माधुरी बोरसे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी राजेश शिवराम पवार याला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.

परिसरात तीव्र संताप नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या या कृत्यामुळे रामेश्वर कॉलनी परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. भरवस्तीत आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button