नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक
जळगाव प्रतिनिधी ;-प्रतिबंधित करण्यात आलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 6 सातशे रुपयाचा मांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिपेठ पोलिसांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री प्रतिबंधीत केलेला असून त्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी जळगाव. मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोख नखाते जळगाव व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदिप गावीत जळगाव भाग यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने दि.३०/१२/२०२४ रोजी रात्री २१.०० वाजेचे सुमारास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गुप्त माहीती मिळाली की, एक ईसम शनिपेठ पो, स्टे. हद्दीत सागर नगर भागात अशोक ईलेक्ट्रिकल नावाचे दुकानात एक ईसम असुन देखील जवळ बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. असे समजल्याने शनिपेठ पो. स्टे येथील पोउपनि योगेश ढिकले, पो.ना किरण वानखेडे, पो.कॉ विक्की इंगळे, मुकुंद गंगावणे, अशांचे पथक तयार करुन सदर ईसम नामे महेंद्र कैलास गोयल वय १९ रा सागर नगर जळगाव यास त्याचे कब्जात असलेल्या स्थितीत नॉयलॉन मांज्याच्या ९ चक्री एकुण ६७००/- किंमत अंदाजे अशासंह मिळुन आल्याने सदर ईसमावर शनिपेठ पो.स्टे सीसीटीएनएस के २८२/२०२४ भा.न्या.सं २२३,१२५, व पर्यावरण संरक्षण अधि. कलम ५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. विजय खैरे करीत आहे.