खान्देशजळगांवशिक्षण

बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

३१ ऑगस्ट अर्ज करण्याची अंतिम मुदत

जळगांव;- केंद्र शासनाच्या वतीने बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बाल शक्ती पुरस्कार २०२४ साठी www.awards.gov.in हया संकेतस्थळाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. अशांना बाल शक्ती पुरस्कार दिला जातो.

मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्या प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस वैयक्तीक गटात बालकल्याण पुरस्कार दिला जातो. संस्था गटात बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी . बालकल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.असे ही श्रीमती सोनगत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button