इतर

मुक्ताईनगर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल 

मुक्ताईनगर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; व्हिडिओ सोशल मीडियावर केला व्हायरल 
​मुक्ताईनगर: तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करून, तिचा नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो (POCSO) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत (IT Act) गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हरताळा शेत शिवार परिसरात ही घटना घडली. संशयित आरोपी ईश्वर  वाघ (मूळ रा. मुक्ताईनगर, ह.मु. पुणे) याने पीडित मुलीला गाठून तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अत्याचार करतानाचा पीडितेचा नग्न व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला.

​या घटनेनंतर आरोपीने ६ मे २०२६ रोजी पीडितेचा हा अश्लील व्हिडिओ स्वतःच्या इन्स्टाग्राम आयडीवरून सोशल मीडियावर प्रसारित केला. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला. अखेर पीडित मुलीने हिंमत दाखवून दिलेल्या फिर्यादीवरून ७ मे रोजी रात्री उशिरा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपी ईश्वर वाघ विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे आणि पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ करत आहेत. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button