राजकीय

नशिराबादचा विकास हाच ध्यास ; कोट्यावधींचा निधी मंजूर – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव l १६ जून २०२३ l नशिराबाद l नगर परिषदेस नशिराबादच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. नशिराबादचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या नगरविकास विभागामार्फत तसेच डी. पी. डी. सी. मधून कोट्यावधींचा निधी मंजूर केलेला आहे. लवकरच नशिराबाद येथे अद्यावत अग्निशमन केंद्र मंजूर करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते नशिराबाद येथे अग्निशमन गाडीचे लोकार्पणप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील हे होते.

डी.पी.डी.सी. च्या 2022-23 मधिल निधीतून अग्निशमन बळकटकरणासाठी रू. 1 कोटी चा निधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता. त्याअंतर्गत नशिराबाद नगर परिषदेच्या अद्ययावत, 14 टन GVW अग्निशमन वाहनाचे आज दिनांक 16 जून रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना सदरचे अग्निशमन वाहन नशिराबाद शहर हद्द
व परिसरातील पंचक्रोशी मध्ये आगीच्या दुर्घटना या पासून संरक्षण यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे असल्याचे मंत्री महोदय यांनी सांगितले. तसेच
नशिराबाद साठी लवकरात लवकर सर्व सोयींनी युक्त असे अग्निशमन केंद्र जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करणार असल्याचे घोषणा याप्रसंगी केली. नशिराबाद येथे नगरविकास विभागामार्फत व डीपीडीसी मार्फत सुमारे २० कोटींचे विकास कामे सुरू असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे

यांची होती उपस्थिती :
सदरच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, मा.सरपंच विकास पाटील, एपीआय रामेश्वर मोताळे, शहर प्रमुख विकास धनगर, चेतन बरहाटे, योगेश पाटील (पिंटू शेठ) मनसे जिल्हाप्रमुख मुकुंदा रोटे यावेळी चंद्रकांत भोळे, गणेश चव्हाण, भूषण कोल्हे, बापू बोढरे, किरण पाटील, अस्लम तनवीर सर, अरुण भोई,सत्तार पैलवान, प्रकाश माळी, संदीप पाटील, प्रदीप साळी, किरण चौधरी,एकनाथ नाथ, चंदू पाटील, प्रदीप देशपांडे, यांच्यासह नशिराबाद येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन कार्यालय अध्यक्ष संतोष रगडे यांनी केले तर आभार मा. सरपंच विकास पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button